जळगाव प्रतिनिधी । बहुचर्चीत असलेल्या नुतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेत कुलगुरू यांनी दोन चौकशी समिती गठीत केली आहे. अशी माहिती पियूष नरेंद्रआण्णा पाटील यांनी दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे,नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांनी बदनामी केल्याप्रकरणी तसेच महाविद्यालयातील विविध विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी व अनधिकृत महाविद्यालय बंद करून जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केले, अनधिकृत महाविद्यालय बंद प्रकरण, नूतन मराठा महाविद्यालयात 14 फेब्रुवारी 2020 रोजी ब्लॉक नंबर-19 चे कौल पडून पाच विद्यार्थ्यांनीना दुखापत झाली होती त्यात एका गर्भवती महिलेला डोक्याला पाच टाके आले होते. तसेच यावेळी मोबाईलच्या माध्यमातून सुरू असलेले सामूहिक कॉपी प्रकरण देखील उघडकीस आले होते.
या संदर्भात पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांनी वेळोवेळी प्राचार्य डॉ. देशमुख यांच्या विरोधात कुलगूरू यांच्याकडे तक्रार देण्यात आले आहे. दरम्यान प्राचार्य डॉ. देशमुख यांची चौकशी करून पदावरून हटविण्यात यावी अशी मागणी देखील कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे केली होती. या तक्रारींची दखल घेत कुलगुरू यांनी प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख यांच्या दोन चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
पहिली समिती
पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांची बदनामी, महाविद्यालयातील विविध विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी व अनधिकृत महाविद्यालय बंद करून जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पहिल्या समितीत शहादा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य, शिरपूर येथील पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठाचे व्याख्याता मान्यता विभागाचे कुलसचिव आर.बी.उगले यांची नियुक्ती केली.
दुसरी समिती
नूतन मराठा महाविद्यालयात दिनांक 14 फेब्रुवारी 2020 रोजी ब्लॉक नंबर 19 चे कौल पडून पाच विद्यार्थ्यांनीना दुखापत झाली होती व एका गर्भवती महिलेला डोक्याला पाच टाके आले होते व यावेळी मोबाईलच्या माध्यमातून सुरू असलेले सामूहिक कॉपी प्रकरण देखील उघडकीस आले होते. यासाठी चाळीसगाव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य, शहादा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य, जामनेर येथे खडायते महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणक शास्त्र प्रशाळाचे प्रा. ए.यु.सुरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पारदर्शक कारवाईची अपेक्षा
चौकशी समिती नेमण्यास थोडा उशीर झाला पण आता समिती अध्यक्ष, अधिकारी, सदस्य यांनी पारदर्शक चौकशी करून अहवाल तयार करावा तसेच कोणत्याही दबावाला बळी न पडता योग्य करवाई करुन न्याय द्यावा हीच अपेक्षा व्यक्त करतो.
– पियुष नरेंद्रअण्णा पाटील
प्राचार्य देशमुख यांच्या ते प्रकरण अंगाशी
आता चौकशी समिति स्थापन झालेली असून वेळोवेळी सुनावणी घेतली जाईल यावेळी प्राचार्य देशमुख यांना सुनावणी दरम्यान हजर रहावे लागणार आहे तसेच प्राचार्य देशमुख यांच्या पियुष नरेंद्रअण्णा पाटील याच्या विरुद्ध घेतलेली जाहिर पत्रकार परिषद, अनधिकृत महाविद्यालय बंद प्रकरण, कौल पडल्या चे प्रकरण तसेच सामूहिक कॉपी प्रकरण इ. आता प्राचार्य देशमुख यांच्यां अंगलट आल्या चे बोलले जात आहे.