जळगाव प्रतिनिधी । 18 नोव्हेंबर या जागतिक निसर्गोपचार दिनानिमित्त मू. जे. महाविद्यालय संचालित सोहम डिपार्टमेंट ऑफ योग नॅचरोपॅथी येथे रवीवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते 10 या वेळात मडबाथआणि योग निसर्गोपचार पंचमहआभौतिक चिकित्सा आणि योग निसर्गोपचार जनजागरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळे दरम्यान उपस्थितांना नैसर्गिक आहार आनंद मेळाव्याचाही लाभ घेता येणार आहे तरी या कार्यशाळेमध्ये सर्व वयोगटातील महिला पुरुषांनी सहभागी व्हावे असे आवाहन संचालिका आरती गोरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9422214841 या क्रमांकावर संपर्क साधावा.