निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदानापासून वंचित ठेऊ नका

अमळनेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील  ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून यासाठी  प्राथमिक माध्यमिक शिक्षक, शासकीय कर्मचारी यांना निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केले आहे. या कर्मचाऱ्यांंना  मतदानापासून वंचित न ठेवता त्यांना मतदानाचा अधिकार मिळवून द्यावा अशी मागणी अमळनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघ तालुका अध्यक्ष संजय कृष्णा पाटील यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

निवेदनाचा आशय असा की, अमळनेर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होता आहेत. याकरिता प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर विभागातील शासकीय कर्मचारी यांना निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केले आहे. यात काही कर्मचारी निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीचे मतदार आहेत.  मात्र त्यांना मतदानासाठी शासन स्तरावर कुठलीही तरतूद केलेली नाही. ग्रामपंचायत स्तरावर एका मतासाठी उमेदवार निवडून अथवा पराभूत होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवणे लोकशाहीसाठी घातक आहे. एकीकडे शासन निर्णयाप्रमाणे व प्रत्येकाने मतदान करण्यासाठी लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे लोकशाही खिळखिळी करण्याचा प्रयत्न करीत आहे.  तरी कर्मचाऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळवून द्यावा अशी मागणी अमळनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघ तालुका अध्यक्ष संजय कृष्णा पाटील यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Protected Content