पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आमदार किशोर पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी त्यांच्या “शिवालय” या निवासस्थानी पत्रकार परिषदेत घेऊन सेना – भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या १८ उमेदवारांचे नावे जाहीर केली.
यावेळी आमदार पाटील यांनी मागील काळात सेनेचे सभापती रावसाहेब पाटील सभापती असतांना पाचोरा, वरखेडी, भडगाव व नगरदेवळा येथे १२ ते १५ कोटी रुपयांची शेतकरी, व्यापारी व हमाल मापाडी यांच्या हितासाठी विविध विकास कामे केल्याचे सांगून नंतर बाजार समितीच्या निवडणुकीत जनतेने शिंदे कुटुंबीयांना नाकारले असतांना त्यांनी कायद्याचा व सत्तेचा दुरुपयोग करुश आमच्या ५ ते ६ संचालकांना अपात्र करुन करोडो रुपयांची बाजार समितीची जागा कवडीमोल किंमतीत स्व: त विकत घेऊन त्यावर मॉल बांधले. यापूढेही मतदारांना लाखो रुपयांची आमिष देवून सत्ता काबीज करण्याचा शिंदे यांचा डाव असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. मात्र मतदारांनी त्यांच्या भुल थापांना बळी पडू नये असे आवाहन करत यापूढे आमच्या पुर्वजांनी जतन करून ठेवलेली बाजार समितीची एक इंचही जागा विकू देणार नाही असे सांगून अमोल शिंदे व सतिष शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, माजी सरचिटणीस सदाशिव पाटील, बाजार समितीचे माजी सभापती प्रताप हरी पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील, भडगाव येथील संजय पाटील (भुरा आप्पा), राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील, नंदू सोमवंशी, गणेश पाटील, संजय शांताराम पाटील सह सर्व उमेदवार उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील यांना २३ एप्रिल रोजी स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणासाठी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असून त्या कार्यक्रमाला आपण उपस्थिती लावाल का ? उद्धव ठाकरे यांच्या सभेमूळे बाजार समितीच्या निवडणुकीत काही परिणाम होईल का ? असे विचारले असता आमदार पाटील यांनी सांगीतले की, स्व. आर. ओ. (तात्या) पाटील हे माझे राजकीय वडील असून त्यांच्या पुतळ्याचे अनावरण होत असल्याने मला आनंद आहे. मात्र याबाबत मला अद्याप निमंत्रण मिळाले नाही. आम्ही स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांचे पाईक व शिवसैनिक २४ एप्रिल रोजी पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. व उद्धव ठाकरे यांच्या सभेने जर परिणाम झाला असता तर त्यांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व महाराष्ट्रभर सभा घेतल्या. मात्र त्यावेळी केवळ ५४ आमदार निवडून आले. यामुळे त्यांची चिंता करण्याचे कारण नाही असे त्यांनी सांगितले.