नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चौथा दोषी पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका (बचाव याचिका) सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. एवढेच नव्हे तर, त्याच्या नावे काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटला स्थगिती देण्यासही कोर्टाने नकार दिला आहे.
न्या. एन. व्ही. रमन्ना, न्या. अरुण मिश्रा, न्या. रोहिंग्टन फली नरीमन, न्या. आर. भानुमती आणि न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सकाळी १०.२५ वाजता पवनच्या याचिकेवर सुनावणी सुरु झाली. क्युरेटिव्ह याचिकेची सुनावणी ही बंद खोलीमध्ये केली जाते, त्यानुसार ही सुनावणी देखील बंद खोलीत पार पडली. यापूर्वी उर्वरित तीन दोषींची क्युरेटिव्ह याचिकाही कोर्टाने फेटाळली आहे. पवनने आपल्या याचिकेत म्हटले होते की, घटना घडली त्यावेळी तो अल्पवयीन होता. याप्रकरणी त्याची पुनर्विचार याचिका यापूर्वीच फेटाळण्यात आली आहे.