नवी दिल्ली वृत्तसंस्था । निर्भया प्रकरणातील आरोपी पवन कुमार गुप्ता याची याचिका आज कोर्टाने फेटाळून लावली.
याबाबत वृत्त असे की, निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातली पवन कुमार गुप्ता या दोषीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. जेव्हा गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन होतो त्यामुळे फाशी देऊ नये अशी याचिका पवन कुमारने केली होती. दिल्ली कोर्टाने हा मुद्दा दुर्लक्षित केला असंही याचिकेत नमूद करण्यात आलं होतं मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. या मुद्द्यामध्ये काहीही नवीन नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे आणि ही याचिका फेटाळली आहे.
दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी चार दोषींना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येईल असा आदेश नव्याने जारी केला आहे. याआधी त्यांना २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येईल असे आदेश जारी करण्यात आले होते. यातच आता पवन कुमार गुप्ताची याचिका फेटाळून लावल्याने त्यांची फाशी अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.