निर्बंधमुक्त दहीहंडी साजरी करण्यासाठी तरुण कुढापा मंडळ सज्ज

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मागील २ वर्षाच्या कोरोना काळानंतर यावर्षी निर्बंधमुक्त दहीहंडीचा सण मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येणार आहे.याच पार्श्वभूमीवर तरुण कुढापा मंडळातर्फे  नवीन कार्यकारणी व विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

काल रविवार दि. २४ जुलै रोजी सुनील राणे यांच्या अध्यक्षतेखाली तरुण कुढापा मंडळाची  नेताजी सुभाषचंद्र बोस व्यायामशाळेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तरुण कुढापा मंडळाची नूतन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.  हितेश सुरेश वाणी यांची मंडळाच्या अध्यक्षपदी  तर उपाध्यक्षपदी चेतन सुधाकर मराठे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी शंभू  प्रभाकर भावसार यांची तर सचिवपदी राजेंद्र तोताराम पाटील, सह सेक्रेटरी प्रशांत सुरेश सुरळकर, खजिनदार हितेश राजेंद्र शिंपी, सह खजिनदार मयूर राजेंद्र ठाकूर, संचलक पदी रोशन राजेंद्र पाटील, सह संचालकपदी ईश्वर रवींद्र सोनवणे,  संघटक गौरव शिवजी चौधरी, सह संघटक भोजराज संतोष बारी यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारणी सदस्य म्हणून संदीप भावसार, योगेश पाटील, गोलू चौधरी, सचिन भावसार, गणेश भावसार, कन्हैया पाटील, राहुल कोळी, नितीन चौधरी, कुणाल कोळी, अक्षय माळी, मुन्ना  मराठे, मोन्टी लोहार, जयेश कोल्हे, शाम शिंपी, जयेश कोल्हे, सुहास जंगले, उमेश अत्तरदे यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान या बैठकीत विविध समितींची गठीत करण्यात आल्या आहेत.  यात शांतता समिती,  सल्लागार, लेझीम पथक, गोविंदा यांचा समावेश आहे. शांतता समितीत निवृत्ती पाटील, मोहित पाटील, भूषण पाटील, प्रज्वल माळी, तुषार सोनार, पप्पू मराठे, राहुल हळदे, यश मराठे यांचा समावेश आहे. सल्लागार म्हणून  शाम पाटील, भोला पाटील, रवींद्र पाटील हे कामकाज पाहणार आहेत. लेझीम पथक शंभू भावसार, पवन शिंपी राजेंद्र पाटील, प्रल्हाद पाटील.  गोविंदा – जयेश मराठे, कन्हैया ठाकरे, ज्ञानेश चौधरी, मोहित ठाकूर, भूषण बुनकर, गोलू चौधरी, भैय्या ठाकूर, भैय्या चौधरी  यांचा समावेश असणार आहे.

सह सेक्रेटरी  प्रशांत सुरळकर यांनी आगामी दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे कसून सरावाचे नियोजन असल्याचे सपष्ट करत शहरातील विविध भागातील दहीहंडी  फोडण्यासाठी तरुण कुढापा मंडळ सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

Protected Content