जळगाव, प्रतिनिधी । गोलाणी मार्केटमधील मोबाईल साहित्य विक्रेते त्यांच्या बंद दुकानांबाहेर विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने उपयुक्त संतोष वाहुळे यांनी पाहणी करून अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या मदतीने कारवाई करत जवळपास साडेचार लाखांचे मोबाईलचा साठा जप्त केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी संकुलन बंद ठेवण्याचे आदेश असतांना गोलाणी मार्केटमधील व्यापारी त्यांच्या बंद असलेल्या दुकानांबाहेर विक्री करतांना आढळून आलेत. याबाबची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी यांना दिली होती. त्यानुसार आयुक्त कुलकर्णी यांनी उपायुक्त संतोष वाहुळे यांना पाहणी करण्याची सूचना दिली.त्यामुळे मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह पथकाने गोलाणी संकुलात पाहणी केली असता मोबाईल व्यावसायिक बंद दुकानाच्या बाहेर मोबाईल विक्री करत असल्याचे दिसताच कारवाई करत मोबाईलचा साठा जप्त केला आहे. यात सद्गुरु मोबाईल, सिध्दीविनायक मोबाईल, अष्टविनायक मोबाईल,नेहा मोबाईल, गोविंद मोबाईल,साईसागर मोबाईल,हरीओम मोबाईल,सम्राट मोबाईल,एसएस मोबाईल, बाबा मोबाईल, तिरुपती मोबाईल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.