जळगाव प्रतिनिधी । कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे कारवाईसाठी स्वत : रस्त्यावर उतरले आहे. शहरातील विविध ठिकाणच्या मंगल कार्यालयात प्रत्यक्ष जावून तपासणी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे आज शहरातील हॉटेल कमल पॅराडाईज, दापोरे मंगल कार्यालय, यश लॉन या ठिकाणी छापा टाकला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी यापुर्वीच कमी उपस्थिती राहून मंगल कार्यालय देण्यात यावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला होता. मात्र शासनाचे नियम झुगारून शहरातील मंगल कार्यालयात होणाऱ्या लग्न सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात दिवसाला १५० हून अधिक कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहे. त्यामुळे आज जिल्हाधिकारी राऊत यांनी एमआयडीसी, शनीपेठ आणि जिल्हा पेठ पोलीसांच्या मदतीने छापा टाकला आहे. अधिक प्रमाणावर गर्दी असलेल्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/431070314651346