अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील निम येथील सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी अतिक्रमण केल्या प्रकरणी त्यांची पदे अपात्र ठरवुन संबंधीतांवर गुन्हा दाखल करावा अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा हिलाल छन्नु सैंदाणे, एकनाथ नामदेव कोळी, प्रतिभा ज्ञानेश्वर पाटील, संगीता मगन चौधरी यांनी दिला आहे.
निम ग्रामपंचायत निवडणुकीत हिलाल छन्नु सैंदाणे, एकनाथ नामदेव कोळी, प्रतिभा ज्ञानेश्वर पाटील, संगीता मगन चौधरी हे पराभूत झाले आहेत. या सर्व पराभूत उमेदवारांनी सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी अतिक्रमण केल्याने त्यांचे पद अपात्र ठरविण्यात यावे अन्यथा गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उद्या सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. निवेदनाचा आशय असा की, जिल्हाधिकारी , .मुख्यकार्यकारी अधिकारी, यांच्या कार्यालयात संबंधीत सरपंच भगवान दगा भिल, उपसरपंच दुर्गा मंगल पाटील, तसेच सदस्य भास्कर हिरामण चौधरी, व सदस्या लीता प्रविण चौधरी ग्रा.पं.निम यांच्या विरोधात त्यांचे सदस्य पद अतिक्रमण केल्या प्रकरणी अर्ज केला आहे. संबंधीतांचे चौकशी ४-५ महिने होवून देखील गटविकास अधिकारी, अमळनेर यांनी चौकशी अहवाल जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेस सादर केलेले नाही. या चौघांविरोधात अतिक्रमण केल्या प्रकरणी त्यांचा सदस्य पद रद्द होवून संबंधीतांवर गुन्हा नोंद करण्यात यावेत अशी मागणी केली आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्यास पंचायत समिती अमळनेर येथे स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिल्याने आज मारवाड पोलिसांनी चौघा तक्रारदारांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पाचारण केले आहे.