नितीन राऊत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडणार-भातखळकर

मुंबई वृत्तसंस्था ।महावितरणच्या ग्राहकांना कुठल्याही प्रकारची माफी अथवा सवलत मिळणार नाही, वीज वापरली तर बिल भरावे लागेल असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. मात्र ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी हक्कभंग ठराव मांडणार असल्याचं सांगितलं आहे.

आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, वीजबिलात सवलत देणार नाही, वीजबिल भरले नसल्यास तात्काळ वीज खंडित करण्याचे आदेश दिले, हा निव्वळ खोटारडेपणाचा कळस आहे. एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर सरकारला जाग आली होती. आता बेशरम आणि खोटारड्या सरकारला १००० व्हॉल्टचा शॉक देणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.

भाजपाने सरकारविरोधात आंदोलन केल्यानंतर वीजबिलात सवलत देऊ असं आश्वासन दिलं, परंतु आज त्यांचा खरा चेहरा समोर आला. सरकारच्या या निर्णयाविरोधात भाजपा पुन्हा आंदोलन करेल,, जनतेची फसवणूक करणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात हक्कभंग ठराव आणू असा इशाराही आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

Protected Content