पाचोरा, प्रतिनिधी । महसूल दिनानिमित्त आयोजित उत्कृष्ट कार्य करणारे वाणेगाव येथील पोलीस पाटील नितीन जमदाडे यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
महसूल दिनानिमित्त उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय पाचोरा मार्फत सन २०२०- २१ या वर्षात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल उपविभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात आले. वाणेगाव येथील पोलीस पाटील नितीन जमदाडे यांना शासनाचा ‘उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार’ उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे आणि तहसिलदार कैलास चावडे यांचे हस्ते देण्यात आला. असा सन्मानपूर्वक पुरस्कार मिळवणारे पाचोरा तालुक्यातील ते एकमेव पोलीस पाटील आहेत. याप्रसंगी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त पोलिस पाटील नितीन जमदाडे यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन केले जात आहे.