रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा आरोग्य केंद्राची नविन इमारत बांधकामासाठी सुमारे साडे चार कोटीच्या कामाला शासनाकडून प्रशासकिय मान्यता मिळाली आहे.यासाठी जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी पाठपुरावा केला होता.
निंभोरा येथे असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रची इमारत जीर्ण झाली होती. यासाठी जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी पाठपुरावा केला होता. अखेर शासनाकडून निंभोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रची नविन इमारत बांधकामसाठी सुमारे साडे चार कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रशासकीय मान्यतेत ४ कोटी ४१ लाख ७१ हजार १८७ रूपयांची मंजूरी मिळाली आहे. लवकरच येथे नविन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.