निंभोरा विकासो चेअरमनपदी सुरेश पाटील यांची निवड 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील निंभोरा येथील विकास सोसायटीच्या चेअरमनपदी कृषिभूषण सुरेश पाटील तर व्हॉइस चेअरमनपदी उषाबाई धनगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निंभोरा विकास सोसायटीची निवडणूक झाली होती यात सहकार पॅनल व परिवर्तन पॅनल यांच्या सरळ लढत होत सहकार पॅनलचे प्रमुख कृषिभूषण सुरेश पाटील यांनी तेरा (13) उमेदवार निवडून आणले होते. आज चेअरमन, व्हॉइस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पार पडली.

यावेळी कृषिभूषण पाटील यांचा चेअरमन पदासाठी तर व्हॉइस चेअरमन पदासाठी उशाबाई धनगर यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुल येवले यांनी काम पाहिले तर सेक्रेटरी विलास पाटील यांचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी नवनियुक्त संचालक राजेंद्र पाटील, जगदीश पाटील, कैलास पाटील, सुनंदा पाटील, बाजीराव पाटील, रतिलाल धनगर कोळी, उषाबाई कोळी, हिंमत पाटील, राजेंद्र वाडेकर, छायाबाई पाटील, रजुबाई पाटील यांची उपस्थिती होती.

Protected Content