रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरासीम येथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून आज तब्बल सहा रूग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून तालुका वैद्यकीय अधिकार्यांनी याला दुजोरा दिला आहे.
रावेर तालुक्यात आधी कोरोनाचा संसर्ग थोपविण्यात यश मिळाले होते. तथापि, नंतरच्या कालावधीत शहरासह तालुक्यातही कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. यातच आता तालुक्यातील निंभोरासीम येथे आज तब्बल सहा रूग्णांच्या स्वॅब सँपलचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. यात अनुक्रमे ४५, ६२, ३७, २९, २९ आणि २० वर्षांचे पुरूष तर २२ वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. आज एकूण १७ रूग्णांचे रिपोर्ट आले असून यात सहा पॉझिटीव्ह व दहा निगेटीव्ह आले असून एक रूग्णाचा रिपोर्ट अजून प्रलंबीत असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आलेली आहे. तालुक्या वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.डी. महाजन यांनी याला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, निंभोरासीम येथे सहा नवीन रूग्ण कोरोना बाधीत असल्याची माहिती समोर येताच या रूग्णांचा रहिवास असणारा भाग सील करण्यात येणार असून त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वॉरंटाईन करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.