Home धर्म-समाज ना. नवाब मलीक विचार मंचच्या जिल्हा कार्यध्यक्षपदी अन्वर खाटीक

ना. नवाब मलीक विचार मंचच्या जिल्हा कार्यध्यक्षपदी अन्वर खाटीक

0
40

यावल,  प्रतिनिधी । यावल तालुक्यातील फैजपुर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदधिकारी अन्वर अजगर खाटीक यांची नामदार नवाब मलीक विचार मंचच्या जळगाव जिल्हा कार्याधक्षपदी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातुन विविध सामाजीक प्रश्न मांडणे व समाजहिताचे कार्य करणाऱ्या अन्वर खाटीक यांनी केलेल्या भरीव कामगीरीची दखल घेत नामदार नवाब मलीक विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष रहेमान खान पठाण व प्रदेश अध्यक्षा सना मलीक यांनी त्यांची जळगाव जिल्हा कार्यध्यक्षपदी निवड केली आहे.  या निवडीबद्दल त्यांचे अल्पसंख्यांक मंत्री ना. नवाब मलिक , पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील ,  राष्ट्रवादीचे नेते माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहीणीताई खडसे , अमळनेरचे आमदार अनिल पाटील, जिल्हा अध्यक्ष अॅड. रवीन्द्र भैय्या पाटील , युवक माजी आमदार मानिष जैन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, यावलचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल वसंत पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश कोलते, बामणोदचे गुणवंत निळ , फैजपुरचे नगरसेवक रशीद तडवी, फैजपुर राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष विनोद कोल्हे, महीला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष  वंदनाताई पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष अॅड. देवकांत पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे, यावल शहर राष्ट्रवादी अध्यक्ष अब्दुल करीम मन्यार, वसंत गजमल पाटील, राष्ट्रवादीचे नाना बोदडे , अॅड. निवृत्ती पाटील, ललित पाटील, अय्युब खान सर, गनी खान, हितेश गजरे आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांचे अभीनंदन केले आहे.

 


Protected Content

Play sound