वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज | राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण तसेच क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आज शहरातील तिरंगा सर्कलला भेट दिली.
वरणगाव शहराचे मध्यवर्ती ठिकाण असणार्या चौकात भव्य राष्ट्रध्वज फडकावण्यात आला असून याला तिरंगा चौक असे नाव मिळाले आहे. येथे सुशोभीकरणाचे मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले असून वरणगावकरांसाठी ते विरंगुळ्याचे ठिकाण बनले आहे.
दरम्यान, आज ना. गिरीश महाजन यांनी आज तिरंगा चौकाला भेट देऊन येथील सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी केली. माजी नगराध्यक्ष सुनील काळे आणि सहकार्यांनी त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी त्यांनी वरणगावकरांना वाढीव घर आणि पाणीपट्टीतून दिलासा मिळणार असल्याची माहिती दिली.