Home आरोग्य नाशिक शहरात गरोदर महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक शहरात गरोदर महिलेचा कोरोनामुळे मृत्यू


नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक शहरात एका 20 वर्षीय गरोदर महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 13 वर पोहचली आहे.

2 मे रोजी एक 20 वर्षीय नऊ महिन्यांची गर्भवती महिला रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर ताबडतोब उपचार सुरु करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर या महिलेचा कोरोनाचा अहवाल आला नव्हता. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आज या गरोदर महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.


Protected Content

Play sound