चाळीसगावात मद्य शौकिनांच्या रांगा : मात्र अद्याप दुकाने न उघडल्याने भ्रमनिरास

चाळीसगाव, प्रतिनिधी । आज मंगळवार ५ मेपासून जळगाव जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने सुरू होतील असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र,दुपारी १ वाजेपर्यत वाईन शॉप उघडलेले नसल्याने मद्य शौकिनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्हा प्रशासनाने सोमवारी वाईन शॉप सुरु करण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने अनेक मद्य शौकिनांमध्ये कालपासून आनंदाचे वातावरण पसरले आहे. आज सकाळी दारु विक्रीची दुकाने सुरू होतील या अपेक्षेने चाळीसगाव शहरातील तहसिल कचेरी जवळील वाईन शॉप तसेच खर्च रोडवरील वाईन शॉप येथे सकाळी आठ वाजेपासून अनेक त्यांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, दुपारचे एक वाजले असून देखील ही दुकाने न उघडल्याने व उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे या मद्य शौकिनांमध्ये भ्रमनिरास होऊन ते वाढत्या उन्हामुळे पुन्हा आपापल्या घराकडे वळले आहेत. मात्र, या रांगांमध्ये अत्यंत शिस्तबद्धपणे सोशल डिस्टन्सिंग पाळतांना दिसून आल्याने इतर ग्राहकांना पेक्षा मद्य ग्राहक काटेकोरपणे शिस्तीचे पालन करतांना दिसून आलेत.

Protected Content