Home क्राईम नाशिकमध्ये दोन मद्यधुंद पोलिसांचा राडा ; वाहन धारकांना मारहाण

नाशिकमध्ये दोन मद्यधुंद पोलिसांचा राडा ; वाहन धारकांना मारहाण

0
68



नाशिक (वृत्तसंस्था)
नाशिकमध्ये दोन मद्यधुंद पोलिसांचा राडा ; वाहन धारकांना मारहाण नाशिकमध्ये रात्रीच्या सुमारास दोन मद्यधुंद पोलिसांनी वाहनांना धडक दिली. एवढेच नव्हे तर, ज्यांची वाहने ठोकली, त्याच नागरिकांना या दोघं पोलिसांनी मारहाण देखील केली.

 

दारुच्या नशेत असलेल्या या दोघं पोलिसांनी लेखानगर भागात वाहनांना धडक दिली. भररस्त्यात ज्यांची वाहने ठोकली, त्याच नागरिकांना या पोलिसांनी मारहाण केली. याप्रकरणी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हे दोन्ही पोलीस कर्मचारी शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत.


Protected Content

Play sound