नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीतून गळती, रुग्णांचा जीव टांगणीला

 

नाशिक : वृत्तसंस्था । राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून गंभीर परिस्थिती असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती होत असून कर्मचाऱ्यांची   धावपळ  झाली .

 

रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं असून गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात १३० रुग्ण दाखल असून गळतीनंतर काही रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

 

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीतून गळती झाली  ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं  . मात्र यामुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला

 

 

महापालिकेच्या नोडल अधिकाऱ्याने  माहितीनुसार, “दुरुस्तीचं काम सध्या सुरु आहे. ऑक्सिजनची मागणी कमी असावी यासाठी काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवलं जात आहे. टाकी अर्धी झाल्यानंतर टँकरमधून पुन्हा ती भरली जाते. यावेळी हा प्रकार घडला”. रुग्णालयात सध्या १३० रुग्ण असून १५ जण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

 

Protected Content