नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग झाल्यानं डॉक्टरचा मृत्यू?

 

नाशिक : वृत्तसंस्था |   मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडलीय. मृत डॉक्टरांच्या कुटुंबाने रँगिंगमुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय.

 

डॉ. स्वप्निल महारुद्र शिंदे असं या मृत डॉक्टरांचं नाव आहे. ते गायनॉकॉलॉजिच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता.  काही महिन्यांपूर्वी याच विद्यार्थी डॉक्टरने रॅगिंगमुळे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिलेत.

 

मृत डॉक्टर स्वप्निल महारुद्र शिंदे यांच्या कुटुंबाने रॅगिंग करणाऱ्या 2 मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. कॉलेज प्रशासनाने मात्र, कुटुंबाच्या आरोपांचं खंडण केलंय. आत्महत्या केलेल्या विद्यार्थी डॉक्टरला वेळो वेळी सहकार्य केल्याचा दावा कॉलेज प्रशासनाने केलाय. तसेच मृत विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचार सुरू असल्याचंही कॉलेज प्रशासनाने म्हटलंय. मानसिक स्थिती ठीक नसल्याने मृत डॉक्टर विद्यार्थ्यांच्या आईला मुलासोबत होस्टेलमध्ये राहण्याची परवानगी दिल्याचाही दावा कॉलेजने केलाय.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले, “हा मृत्यू नेमकं का झाला, कशामुळे झाला याची अधिकृत माहिती आलेली नाही. पालकांचं म्हणणं एक आहे, महाविद्यालयाचं म्हणणं एक आहे. याची चौकशी शासन स्तरावर घोषित करण्यात येतेय. हा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोस्ट मोर्टम व्हायचं आहे. मृत डॉक्टरांच्या पालकांशी संवाद साधू.”

 

Protected Content