नाभीक समाजाच्या कर्मचारी महामेळाव्याला उपस्थितीचे आवाहन

भडगाव प्रतिनिधी । चाळीसगाव येथे १३ फेब्रुवारी रोजी उत्तर महाराष्ट्र विभागिय नाभिक कर्मचारी महामेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. याला समाजाबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव जिल्हा नाभिक समाज कर्मचारी संघटना व चाळीसगाव तालुका नाभिक समाज कर्मचारी संघटना यांच्या सयुक्त विद्यमाने चाळीसगाव येथे १३ फेब्रुवारी रोजी उत्तर महाराष्ट्र विभागिय नाभिक कर्मचारी महामेळावाचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगाव जिल्हात शासकीय, निमशासकीय सेवेत विविध विभागात कर्मचारी म्हणुन नाभिक बांधव कार्यरत आहे. या सर्व कर्मचारीना एका छत्र खाली आणून त्याची एकत्रीत मोट बांधण्यात शासकीय, निमशासकीय कर्मचारी बांधवाचा समाजला विकासात्मक लाभ कसा होईल यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रयत्न करीत आहे.

यासाठी दिनांक १३ फेब्रुवारी रोजी संत सेना महाराज मंदीर खरजाई रोड, (रेल्वेगेट जवळ) चाळीसगाव येथे उत्तर महाराष्ट्र विभागिय नाभिक कर्मचारी महामेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. यामेळाव्यास नाभिक महामंडळाचे प्रदेशध्यक्ष कल्याराव दळे, महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळाचे राज्यध्यक्ष उत्तमराव सोलाने, नाभिक महामंडळ युवक प्रदेशध्यक्ष सुरेद्र कावरे, महामंडळाचे कार्याध्यक्ष दामोदर बिडवे, महिला प्रदेश अध्यक्ष भारतीताई सोनवणे, मेळाव्याचे मार्गदर्शक नानासाहेब शिरसाठ सह विविध प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे.

या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहान मेळाव्याचे स्वागतध्यक्ष नाभिक समाज जळगाव जिल्हाध्यक्ष बंटीभाऊ नेरपगारे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बहाळकर, नाभिक समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. मनोहर खोंडे, चाळीसगाव कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय वाघ यांनी केले आहे.

Protected Content