मुंबई प्रतिनिधी l एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लिमलेटची गोळी मिळणार की कॅडबरी? असा खोचक सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.
भारतीय जनता पक्षाचे वजनदार नेते एकनाथराव खडसे यांनी आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आता खडसे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते यांच्यामध्ये वाक् युद्ध सुरू झाल्याचे दिसून येत आहे. एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन काही तास उलटत नाही तोच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना खोचक प्रश्न विचारला आहे. खडसे यांच्यावर अन्याय झाला होता तर तो चर्चेतून सोडवता आला असता असे ते म्हणाले. तसेच खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील लिमलेटची गोळी मिळणार आहे का कॅडबरी? असा खोचक प्रश्न देखील त्यांनी विचारलेला आहे.