रावेर । महाराष्ट्राच्या राजकारणातील रुबाबदार व्यक्तिमत्व, खान्देशचे सुपुत्र म्हणून ओळखले जाणारे तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील रोखठोक व्यक्तित्त्व म्हणजे महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे. विधान भवनात सत्ताधाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नावर विचार करण्यास भाग पाडणारे , मास लीडर म्हणून ओळखले जाणारे नाथाभाऊ सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नावर विधानभवनात धारेवर धरत असत. खान्देशात गेल्या 40 वर्षांपासून आपली राजकीय कारकीर्दीत विविध कार्य करून सदैव जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ‘जाणता राजा’ बनून राहिले. आपल्या प्रदेशातील विविध प्रश्न विधान भवनात वारंवार लावून धरणारे नाथाभाऊ त्यासाठी निरंतर लढत राहिले. आपल्या राजकीय प्रवासात एकही निवडणूक न हरणारे भाऊ महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळेच व्यक्तिमत्व. त्यांच्या निडर व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या कार्यकर्त्यावर निरंतर परिणाम दिसत असे. तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन कोणतेही कार्य करायचे असेल तर सर्वप्रथम त्यांच्याशीच वार्तालाप ते सतत करत असतात. पक्ष हा मोठा कार्यकर्त्यांनी बनतो नेत्यांनी नाही, असे आपल्या स्नेही कार्यकर्त्या विषयी त्यांचे ब्रीद वाक्य. कार्यकत्यांवर निरंतर प्रेम करणारे नाथाभाऊ एक राजकारणातील वेगळा चेहरा.
आज घडीला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या कन्या रोहिणीताई खडसे या राजकारणासह समाजकार्यात पूर्ण सक्रिय झालेल्या दिसून येत आहेत.विविध कार्यामध्ये भाऊ सारखेच काम करण्याची शैली असल्याकारणाने जळगाव जिल्ह्यात त्या खूप कमी वेळामध्ये लोकप्रिय झालेल्या दिसून येतात . त्यांची धाडसी कार्यपद्धत व कार्यकर्त्या बद्दल आपुलकीच्या भावनेमुळे कार्यकर्त्यांना आज घडीला त्यांच्यामध्ये भविष्यातील नाथाभाऊ दिसून येत आहे.
आपल्या कणखर व निडर कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यातील लोक त्यांच्याशी निरंतर जुळून येताना दिसत आहेत. मुद्देसूद वक्तव्य,धाडसी छबी, मुक्ताईनगर तालुक्यासाठी काहीतरी नवीन करून दाखवण्याची धमक त्यांच्यामध्ये नाथाभाऊ प्रमाणेच दिवसेंदिवस दिसून येत आहे.
काही दिवसातच सर्व घटकांशी जळून घेतल्यानंतर रोहिणीताईने विविध कामे हाती घेतली.त्या कामाला योग्य दिशा देण्याचा यांचा निरंतर प्रयत्न असतो. प्रत्येक कामाचा पाठपुरावा करून विविध कामे करूनही दाखवली. नाथाभाऊनाही रोहिणीताई मध्ये कुशल नेतृत्वाची जाणीव लहानपणापासूनच आलेली होती. महाराष्ट्राचे महत्वपूर्ण नेते असल्याकारणाने त्यांना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये फिरावे लागत असे.त्यांना आपल्या मतदारांना वेळ देणे शक्य होत नसल्याने आपल्या जिल्ह्यात नागरिकांना व कार्यकर्त्यांना त्यांची कमतरता भासू नये यासाठी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांनी रोहिणीताई खडसे यांच्यावर सोपवली. सुरवातीच्या काळामध्येच रोहिणीताई यांच्यावर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली . नेतृत्वाचे गुण जन्मताच असल्याने त्यांनी बँकेचे कार्य अत्यंत कुशलतेने हाताळून जिल्हा बँकेला महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर नेण्याचा मान मिळवला. जळगाव जिल्ह्यात नाथाभाऊने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमात कार्यकर्त्यांचे सुख,दुःख जाणून घेतले.मतदार संघातील नागरिकांच्या अडी- अडचणी त्यांनी कधीही वेळ वाया न घालविता तातडीने पूर्ण केल्या. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यात त्या अतिशय लोकप्रिय होताना दिसून येत आहेत. अनेक नवीन कार्यकर्तेही त्यांच्या या धाडसी कार्यपद्धतीमुळे त्यांच्याशी जुळलेले आहेत. नाथाभाऊ प्रमाणे आजच्या घडीला त्यांच्याजवळ हे कार्यकर्ते आपली समस्या घेऊन येताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांची अडचण दूर करण्याची तळमळ त्यांनी लहान पणापासूनच नाथाभाऊंच्या सहवासात असतांना अंगीकृत केली. आज प्रत्यक्षात नाथाभाऊ सारखेच प्रश्न सोडवण्याची ताकत त्यांच्यात रुजताना दिसत आहे. सर्व कार्य स्वतः करण्याची तयारी ठेवून त्या मुक्ताईनगर वाशीयासाठी व सर्वसामान्य जनतेसाठी लढताना दिसत आहेत. आपल्या परिक्षेत्रातील सामान्य जनतेला मदत करण्यासाठी निरंतर अहोरात्र आपले द्वार त्यांनी खुले ठेवले आहे.
आपल्या मतदारसंघातील नागरिकांना काही अडचणी येत असतील त्या सोडवण्यासाठी त्यांनी विविध कार्य अवलंबले. विद्यार्थीवर्ग, महिला, शेतकरी व्यापारी यांचे कोणतेही प्रश्न असो रोहिणीताई त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी सतत उभे राहतात. आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक धाडसी निर्णय घेतले. मागील दशकापासून जिल्हा बँकेत थांबलेली नोकर भरतीचा मार्ग ही त्यांनी मोकळा केला. भाऊंचा वारसा वाढवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची चिंता न करता वेळोवेळी जिल्हा पिंजून काढला. ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुकीतही त्यांनी जिल्ह्यात ठिकाणी विविध रचना आखून आपल्या नेतृत्वाची चुणूक कधीच दाखवून दिली.
नाथाभाऊंनी मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेती मालाला योग्य भाव मिळण्यासाठी मुक्ताई साखर कारखान्याची नव्याने सुरुवात केली व त्याची धुरा रोहिणीताई वर सोपवली. परंतु ऊस लागवडी संदर्भात परिसरातील शेतकऱ्यांचे पूर्वीचे वाईट अनुभव होते. या कारणाने शेतकरी वर्ग ऊस लागवडीस तयार नव्हते. तेव्हा रोहिणीताई खडसे या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेल्या, त्यांना विश्वास दिला. त्यांच्या विश्वासामुळे परिसरात ऊस लागवड झाली. त्यांनी राज्यातील इतर कारखान्यापेक्षा उसाला अधिक भाव दिला.साखर कारखान्याने यशस्वीतेचे सहा हंगाम संपून सातव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. या कारखान्यामुळे अनेक पटीने मेगावाट सह वीज निर्मिती करून प्रकल्पाची उभारणी देखील केली आहे.कारखान्यातील टाकाऊ पदार्थ पासून वीज निर्मिती करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. त्याचबरोबर शेतातील कपाशी आणि तूर यांच्या काड्या व व सोयाबीन, मका यांची खरेदी करून त्यापासून शेतकऱ्याना फायदा मिळेल असे अनेक उपक्रम त्यांनी आपल्या कारखान्यातून राबविण्याचा निर्धार केला.
मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने नाथाभाऊंनी सूतगिरणी सुरू केली होती. परंतु दुर्दैवाने 2013 मध्ये स्वर्गीय निखिल खडसे यांचे निधन झाले आणि सूतगिरणीचे काम परत एकदा थंड बस्त्यात पडले. आपले दुःख बाजूला ठेवून भाऊंनी अँड. सौ रोहिणी खडसे यांच्याकडे सुतगिरणीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली. स्वतः ॲडव्होकेट असल्याने या क्षेत्राशी कसल्याही प्रकारची माहिती नसतानाही त्यांनी आदिशक्ती मुक्ताई सह
सूतगिरणीच्या कार्याला हात घातला. आपल्या परिसरातील स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध असावा या पवित्र भावनेने त्या सूत गिरणीचे अध्यक्षा बनल्या. आजच्या घडीला या सूतगिरणीचे कार्य अतिशय सुंदर पद्धतीने हाताळून युवकांना रोजगार देण्यामध्ये रोहिणी ताई यांचा सिंहाचा वाटा आहे. स्वतः उच्चशिक्षित असल्याने मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीची धुरा नाथाभाऊंनी त्यांच्यावर सोपवली. ही जबाबदारी ही त्या अतिशय यशस्वीपणे पार पाडत आहेत. कमी काळामध्ये या युवा नेतृत्वाने सर्व जनतेच्या मनामध्ये एक वेगळी छबी तयार केली आहे.
वर्ष 2020 च्या सुरुवातीस देशावर कोरोना महामारीचे संकट उद्भवल्याने कित्येक लोकांचा संसार हा रस्त्यावर आला. अनेक राज्यातील मजूर आपले पोट गावात भरत नसल्याने शहराकडे वळली होती. शहरात वास्तव्यात असतानाच या महामारी मुळे शहरास त्यांना कोणतेही काम मिळेना म्हणून परतीच्या मार्गाला ते निघाले. रस्त्यात त्यांना एक टाइमचे एक टाइमाचे जीवनही मिळणे कठीण होऊन बसले. या गोर-गरिबांचे जीवन अस्वस्थ पाहून नाथाभाऊंनी आपल्या आमदारकीसाठी मिळणाऱ्या पेन्शन मधून या गरिबासाठी कोरोना काळामध्ये जेवणाची छावणी स्वखर्चाने उभारून एक आदर्श समाजासाठी निर्माण केला. त्यामध्ये कोरोनाची तमा न बाळगता रोहिणीताई खडसे यांनी भर लाँक- डाऊन मध्ये स्वतः अल्प पोहार व श्रमिकासाठी जेवण आपल्या हाताने वाटून श्रमिक वाटसरू यांचे आशीर्वाद घेतले.
याच काळामध्ये निस्वार्थ भावाने सेवा करणारे कोरूना योद्धा यांचा सत्कारही त्यांनी आपल्या संवेदना फाऊंडेशनच्या माध्यमातून केला. त्यांच्या कामाचा जय- जयकार हो त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सरकारी-निमसरकारी समाजसेवक विविध क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचा त्यांनी मोठ्या मनाने सत्कार करून त्यांच्या पाठीवर शब्बासकीचा हात ठेवला.याच काळामध्ये गेल्या 40 वर्षांपासून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची यशस्वी धुरा सांभाळणारे नाथाभाऊ आपल्याच पार्टीकडून निरंतर अपमानित होत राहिले. वारंवार अपमान केल्यावर ही आपला स्वाभिमान कधीही गहाण न ठेवणारे नाथाभाऊ कार्यकर्त्यांच्या शब्दाला मान देऊन, पार्टीचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मा. शरद पवार यांच्या शब्दाला मान देऊन असंख्य कार्यकर्त्यांसोबत सामील झाले. गेल्या कित्येक दिवसापासून आपल्याच पार्टीकडून मिळालेला अपमान अनावर होऊन भाऊंनी आपला मार्ग बदलला. ‘भाऊ जहां, हम वहां’ हे कार्यकर्त्यांचे घोषवाक्य. याप्रमाणे महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्ते व रोहिणीताई यांनी मोठ्या थाटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्व करण्याचा निर्धार मनामध्ये बांधला. एक नव्या पर्वाची सुरुवात,एका नव्या इनिंगची सुरुवात करताना अगदी जोमा मध्ये,नव्या जोशा मध्ये नाथाभाऊ व रोहिणीताई आपल्या कार्यकर्त्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महाराष्ट्रभर मोट बांधण्याची तयारी करण्याचा निर्धार अंगीकारला आहे.
भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणातील चमकता हिरा रोहिणीताई बनतील यात मुळीच संकोच नाही असे म्हणायला वावगे ठरणार नाही. व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे वेळोवेळी मिळणारे मोलाचे मार्गदर्शन निश्चित भविष्यात त्यांना’भविष्यातील नाथाभाऊ’ होण्यास मदत करतील अशी भावना अनेक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
आज रोहिणी ताई खडसे खेवलकर यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांचे हार्दिक अभिष्टचिंतन
त्यांना उदंड निरोगी दिर्घायुष्य लाभो
हि परमेश्वर चरणी प्रार्थना
-सुमित राजेंद्र ब-हाटे
भुसावळ