Home आरोग्य नागपूरच्या आमदार निवासात क्वॉरंटाइन करण्यात आलेल्या ९ जणांना करोनाची लागण !

नागपूरच्या आमदार निवासात क्वॉरंटाइन करण्यात आलेल्या ९ जणांना करोनाची लागण !


नागपूर (वृत्तसंस्था) नागपूरच्या आमदार निवासात क्वॉरंटाइन करण्यात आलेल्या ९ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. तर नागपूर मनपा क्षेत्रातील करोना रुग्णांची संख्या आता ६७ झाली आहे.

 

कोरोनाच्या संशयावरून काही लोकांना आमदार निवासात क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्यापैकी ९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या ९ पैकी ५ जण शांतीनगर परिसरातील असून हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच या ९ रुग्णांच्या कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनाही क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. शिवाय हे नऊ रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात होते, याचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान, नऊ नवे करोना रुग्ण सापडल्याने नागपूर महानगर पालिका क्षेत्रातील करोना रुग्णांची संख्या ६७वर गेली आहे.


Protected Content

Play sound