नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांसोबत ड्युटीवर असलेल्या शिक्षकाला ट्रकचालकाने चिरडले

सांगली (वृत्तसंस्था) नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांसोबत ड्युटीवर असलेल्या शिक्षकाला ट्रकचालकाने चिरडून ठार मारल्याची घटना आज पहाटे सांगलीत एका चेक पोस्टवर घडली. नानासाहेब कोरे असे मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

 

तालुक्यातील डफळापूर गावाजवळ असलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी ही घटना घडली. नानासाहेब कोरे नामक शिक्षक हे चेकपोस्टवर पोलिसांना मदतनीस म्हणून कार्यरत होते. सिमेंट भरलेला ट्रक आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शिंगणापूर नाक्यावर पोहचला. यावेळी चालकाने ट्रक न थांबवता पुढे निघून जात होता. त्यामुळे नानासाहेब कोरे यांनी ट्रकला थांबण्याचा इशारा केला. मुजोर चालकाने ट्रक न थांबवता थेट कोरे यांच्या अंगावर घातला. त्यामुळे ट्रकखाली चिरडून कोरे हे जागीच ठार झाले. दरम्यान, आरोपी ट्रक चालक हणमंत रामचंद्र मुरड याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

Protected Content