नांदेड ते भुसावळ ही बससेवा यावल पर्यंत वाढविण्याची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नांदेड ते भुसावळ ही बससेवा यावल पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी परिसरातील प्रवाशांनी केली आहे.

 

या संदर्भातील वृत्त असे की, सर्वाची आवडती लालपरी यंदाच्या रमजान व अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आपल्या गावाकडे येणार्‍या  प्रवाशांचा यावल आगारास शासनावे दिलेल्या भाडे सवलतीमुळे महीलांसह अमृत जेष्ठ नागरीकांचा मिळाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन येत आहे.   यंदाच्या मुस्लीम बांधवांची रमजान ईद व हिन्दु बांधवांची अक्षय तृतीया या दोघा ही सणाच्या निमित्ताने आपआपल्या गावाकडे येणार्‍या प्रवाशांनी आपल्या आवडत्या लालपरीला ( एसटी ) ला मोठा प्रतिसाद दिल्याने यंदा यावल आगाराने मागील चार दिवसात  परतीच्या मार्गावर निघालेल्या प्रवाशांच्या ओघाने दिवसात मागील उत्पन्नाचा टप्पा ओलांडला असुन, अपेक्षा पेक्षा भरीव व अधिक चांगले उत्पन्न मिळाल्याची माहीती आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी दिली आहे.

 

यावल चे एसटी आगार हे मागील काही वर्षा पासुन विविध समस्या व अडचणीनी ग्रस्त असुन , एकुण ८३ एसटी बसेसची संख्या आवश्यक असलेल्या यावल आगार फक्त ६३ एसटी बसेसवर अवलंबुन असुन, ज्यामध्ये अनेक बसेस यावल आगारात नादुस्त अवस्येत व भंगार जमा झालेल्या  आहे.

 

याशिवाय यावल तालुक्यातुन आपल्या वैद्यकीय शिक्षणासाठी नांदेड या ठीकाणी मोठया प्रमाणावर विद्यार्थी जातात. त्यामुळे नांदेड हुन भुसावळ पर्यंत येणारी बस ही यावल पर्यंत करावी अशी मागणी अनेक विद्यार्थी पालक व प्रवासांची असुन तसे झाल्यास आपल्या शैक्षणिक कार्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोयीचे असेल.  या विषयावर एसटी विभागाने देखील लक्ष देणे गरजे आहे.

Protected Content