नशेमन कॉलनीत उघड्या घरातून रोकडची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नशेमन कॉलनीत उघड्या घरातून १५ हजाराची रोकड आणि इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी ११ एप्रिल रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिसाहक इब्राहिम रंगरेज (वय-७०) रा. नशेमन कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी १० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचे घर उघडे असतांना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरात ठेवलेले १५ हजाराची रोकड आणि बँकेचे पासबुक, चेकबुक असे साहित्य चोरून नेले. हा प्रकार घडल्यानंतर हिसाहक रंगरेज यांनी मंगळवारी ११ वाजता रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर करीत आहे.

Protected Content