नशिराबाद येथे फोडले बंद घर 

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील वाघुर कॉलनीत शेतकऱ्याचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण १ लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविल्याचा घटना समोर आली आहे. या संदर्भात शुक्रवार १४ ऑक्टोबर रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चंद्रकांत देविदास पाटील (वय-३४) रा. वाघुर कॉलनी, खलची अळी, नशिराबाद ता. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान अज्ञात छोट्याने त्यांच्या घराचे बंद कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण १ लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेण्याचे उघडकीला आले आहे. या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी तातडीने नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.

Protected Content