जळगाव प्रतिनिधी । नशिराबाद येथे प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष मोहन माळी यांनी नविन कार्यकारीणी जाहीर केली.
सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील नशिराबाद येथे प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालयात शुक्रवारी सकाळी १० वाजता पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पक्ष वाढीसाठी पक्षातील कार्यकर्त्यांची नोंदणी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. नगरपरिषदेबाबत तक्रारी जनतेपर्यंत जावून सोडवाव्यात यासाठी कार्यकर्त्यांना शहराध्यक्ष मोहन माळी मार्गदर्शन करण्यात आले.
आज झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात शहर उपाध्यपदी शेख इस रारुदिन रजीउद्दीन, शहर संघटक पदी विशाल टेमकर, शहर सरचिटणीस शेख आबीद शेख फारुख, शहर प्रसिद्धीप्रमुख किशोर चौधरी, महिला शहराध्यक्षपदी ललिता मोहन पाटील, महिला शहर कार्याध्यक्षपदी मयुरी भगवान टापरे, महिला शहर सरचिटणीस अर्चना रोटे यांची निवड करण्यात आली.