जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतांना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बुधवार १९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बाळू त्र्यंबक पाटील हे मंगळवारी १८ एप्रिल रोजी रात्री १० वाजता लतीफशबाबा दर्गा येथे ड्यूटीवर असतांना भवानी नगरात राहणारे राम मुकेश करोसीया, शुभम विलास मोरे आणि एक अनोळखी तरूण हे दुचाकीवरून जात असतांना मोठ मोठ्याने घोषणा देत होते. यावर पोलीस कर्मचारी बाळू पाटील यांनी हटकले असता चालत्या दुचाकीला धक्का दिला व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार घडल्यानंतर पोलीस कर्मचारी यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवार १९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी राम मुकेश करोसीया, शुभम विलास मोरे आणि एक अनोळखी तरूण या तिघांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.