जळगाव प्रतिनिधी । नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात आज न्यूमोकोकल लसीकरण केंद्राचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, आरोग्य सभापती रविंद्र पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार, तहसीलदार नामदेव पाटील, पंचायत समिती सभापती ललिता पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, डॉ. समाधान वाघ, डॉ. प्रमोद पांढरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ पराग पवार, डॉ. चेतन अग्निहोत्री आदी उपस्थित होते.
न्यूमोकोकल लस अर्थात पीसीव्ही लास खासगी रूग्णालयात अडीच हजार रूपयाला उपलब्ध होते. मात्र शासनाच्या वतीने ही लस एक वर्षाच्या आतील लहान मुलांसाठी मोफत उपलब्ध झाली आहे या लसीमुळे लहान मुलांना निमोनिया हा आजार होणार नाही. लवकर नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रावर न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन मोफत मिळणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांनी उद्घाटनाप्रसंगी सांगितले.