जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्या मंदीर शाळेत पालक-शिक्षक सभा शाळेच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात घेण्यात आली.
या सभेला नशिराबाद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जनार्दन माळी, कार्याध्यक्ष योगेश पाटील, संचालक गोविंदा भोळे, विनायक वाणी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सी. बी. अहिरे, जे. वाय. महाजन, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रवीण महाजन उपस्थित होते.
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रवीण महाजन यांनी सभेचे प्रास्ताविक केले. त्यांनी पालक शिक्षक संघाची आवश्यकता विशद करून पालक व शिक्षक यांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच सुसंस्कार करण्याची गरज असल्याचे सांगितले. शिक्षक तुषार रंधे यांनी पालक शिक्षक संघाचे वैशिष्टे व कार्य सांगितले. तर उपशिक्षिका सुनीता न्हावी यांनी पालक शब्दाचा अर्थ सांगून पालकांची भूमिका काय असावी याबाबत मार्गदर्शन केले.
संस्थेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्ता विकासासाठी प्रोजेक्टर आणि ई-लर्निंगची सुविधा असल्याचे प्रात्यक्षिकातून दाखवून दिले. तसेच पालकांच्या विविध शंकांचे निरसन संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील यांनी केले. अध्यक्षीय भाषणात संस्थाध्यक्ष जनार्दन माळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पालक-शिक्षक संघाची कार्यकारणी निवडण्यात येवून नूतन पालक पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारिणी याप्रमाणे उपाध्यक्ष यशवंत माळी, सचिव वंदना पाटील, वैष्णवी भट, सहसचिव निलिमा रोटे, विद्यार्थी प्रतिनिधी ऋषी पाटील व डिंपल रोटे यांची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन शिल्पा पाठक व नेहा चौधरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन शितल चावरे यांनी केले.