नव युवा मंचतर्फे देवगाव देवळी गावाला शव पेटी भेट

अमळनेर प्रतिनिधी । तालुुक्यातील देवगाव देवळी येथील नव युवा मंचतर्फे गावाला शव पेटी प्रदान करण्यात आली असून याचे लोकार्पण करण्यात आले.

या अगोदरही नव युवा मंचतर्फे सामाजिक बांधिलकी जोपासायचे काम गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. समाजातील तळागाळातल्या मुलांना त्यांच्या अडीअडचणी सोडण्याचं काम या मंचाच्या वतीने केली जाते. यानंतर आता गावकर्‍यांसाठी शवपेटी प्रदान करण्यात आली आहे. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सरपंच अशोक पाटील, ग्रामसेवक आर. डी. पाटील, धर्मराज रामचंद्र पाटील, नवल पाटील, नाना देवराम पाटील, मुख्याध्यापक प्रेमराज बोरसे, साहेबराव पाटील, उखर्डू बैसाणे, सुकदेव माळी, गोकुळ माळी, धनसिंग भिल यांच्यासह ग्रामस्थ व नव युवा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.

नव युवा मंचाच्या पदाधिकारी मुकेश पाटील, भटू पाटील, छोटू मोरे ,रवींद्र पाटील ,दिनेश पाटील, यांचा सत्कार देवगाव देवळी चे सरपंच अशोक पाटील यांनी केला. त्यांच्या या उपक्रमाचे प्रगतशील शेतकरी धर्मांआण्णा पाटील यांनी कौतुक करून आपल्या युवामंचाकडून अशी सामाजिक सेवा घडो अशा शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला देवगांव देवळी येथील शिक्षणप्रेमी,माजी विद्यार्थी, तरुण मंडळाचे पदाधिकारी, महात्मा फुले हायस्कुलचे मुख्याध्यापक अनिल महाजन,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जि.प.कर्मचारी, अंगणवाडी सेविका विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत माजी व आजी सदस्य व पोलीस पाटील उपस्थित होते.

Add Comment

Protected Content