जळगाव प्रतिनिधी । नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
जिल्हा परिषदेचे सीईओ शिवाजी दिवेकर यांच्या जागी नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. सायंकाळी पाच वाजता त्यांचे जि.प उपाध्यक्ष, सदस्यांसह विविध संघटनांनी स्वागत केले. यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. दरम्यान, याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी आपण झीरो पेन्डन्सीला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत संघटनेसह विविध संघटनांनी तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्यासह सदस्यांनी डॉ. बी.एन. पाटील यांची भेट घेऊन ओळख परिचय करून दिला.