जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन बी.जे. मार्केटमधील वर्कशॉप फोडून २२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी १९ जून रोजी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक मुरलीधर मावळे (वय-६५) रा. पिपल्स बँकेसमोर, तुकारामवाडी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याचे नवीन बी.जे. मार्केट परिसरात वर्कशॉप दुकान आहे. रविवारी १८ जून रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडून दुकातील ९ हजार रूपयांची रोकड, ड्रील मशीन, ईलेक्ट्रीक मोटार यासह इतर भंगार साहित्य चोरून नेले. हा प्रकार सोमवारी १९ जून रोजी सकाळी त्यांच्या दुकानाचे शेजारी असलेले गिरीश वारके यांच्या लक्षात आले. त्यांनी अशोक मावळे यांच्याशी संपर्क साधून दुकान फोडल्याची माहिती दिली. मावळे यांनी सकाळी ८ वाजता दुकानावर धाव घेवून पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबत महेंद्र पाटील करीत आहे.