जळगाव, प्रतिनिधी | महानगरपालिकेने मनमानी कारभार थांबवून नवीन नळ कनेक्शन मिळण्याबाबतची जाचक अट रद्द करण्याची मागणी शहर काँग्रेस कमिटीने निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे.
आज जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त यांना काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ यांनी भेट देऊन महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. व महानगरपालिकेने सुरु केलेला मनमानी कारभार तात्काळ थांबवावा. हे लक्षात आणून दिले. नवीन नळकनेक्शन नागरिकांना देण्याकरता नळ कनेक्शन धारकाने मालमत्ता कर हा भरलेला असावा व त्यानंतरच त्याला नवीन नळ कनेक्शन हे मिळेल अशी जाचक अट घातलेली होती. त्यामुळे नवीन नळ कनेक्शन मिळण्याबाबतची जाचक अट रद्द करण्याची मागणी शहर काँग्रेस कमिटीने निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे. निवेदनात मालमत्ता कर भरण्याची आज शेवटची तारीख होती. परंतु आपणा सगळ्यांना चांगल्याप्रकारे माहिती आहे की, मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोना महामारी मध्ये असंख्य नागरिकांचे रोजगार बुडाले. त्याच पद्धतीने कामधंदे उध्वस्त झाले आहे. त्या अनुषंगाने आज जळगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली एक काँग्रेस पक्षाचा शिष्टमंडळ यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन नवीन नळ कनेक्शन मिळण्याची ही जाचक अट रद्द करावी व केवळ नळकनेक्शन फी आकारून नागरिकांना नवीन नळ कनेक्शन देण्यात यावे अशी मागणी केली आहे. तसेच मालमत्ता कर भरण्याकरिता मुदत वाढवून देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.
याप्रसंगी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस बाबा देशमुख, अल्पसंख्यांक महानगराध्यक्ष अमजद पठाण, सरचिटणीस प्रदीप सोनवणे, राहुल भालेराव, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष जाकिर बागवान, सुधीर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.