जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवकॉलनी येथे माहेर असलेल्या विवाहितेला नवीन घर घेण्यासाठी माहेरहून पैशांची मागणी करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २८ मार्च रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शिवकॉलनी येथे माहेर असलेल्या धनश्री योगेश जाधव (वय-२९) यांचा विवाह शिवाजी नगरातील योगेश अरूण जाधव यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती योगेश याने नवीन घर घेण्यासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी केली. दरम्यान, विवाहितेच्या आईवडीलांची परिस्थीती हालाखीची असल्याने विवाहितेने पैसे आणले नाही. याचा राग मनात ठेवून पती अरूण जाधव याने विवाहितेला शारिरीक व मानसिक छळ केला. शिवास सासू, सासरे, दिर, जेठ यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. मंगळवारी २८ मार्च रोजी विवाहितने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती योगेश अरूण जाधव, सासू आशा अरूण जाधव, सासरे अरूण विठ्ठल जाधव, अविनाश अरूण जाधव आणि ज्ञानेश्वर अरूण जाधव सर्व रा. शिवाजी नगर, जळगाव यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.