Home Cities एरंडोल नविन वसाहतींच्या कच्च्या रस्त्यांवर मुरुम टाका ; नगरसेविका वर्षा शिंदे यांची मागणी

नविन वसाहतींच्या कच्च्या रस्त्यांवर मुरुम टाका ; नगरसेविका वर्षा शिंदे यांची मागणी

0
27

एरंडोल, प्रतिनिधी । येथील प्रभाग क्र.१ मधील नविन वसाहतींतील कच्च्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्याची मागणी आज दि.१९ जुन रोजी नगरसेविका वर्षा शिंदे यांनी मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनाचा आशय असा की, नगरसेविका वर्षा शिंदे यांच्या प्रभाग क्र.१ मधील सर्वच वसाहतींतील बरेच रस्ते कच्चे आहेत तसेच याठिकाणी अजुनही सांडपाणी वाहुन जाण्यासाठी गटारी किंवा पर्यायी व्यवस्था नाही. पावसाळ्यात अनेक ठिकाणी मोठयप्रमाणात खड्ड्यांमध्ये पाणी साचते व नागरिकांना वापरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे म्हटले आहे. या खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडू नये.म्हणुन त्या रस्त्यांवर मुरुम टाकुन खड्डे बुजवून नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी विनंती केली आहे. सदर निवेदन मुख्याधिकारी एरंडोल यांचे सोबतच पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी जळगाव यांना सुद्धा सादर करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound