नवनिर्वाचित चेअरमन आ. चव्हाण यांची सर्वांच्या मदतीने दुध संघाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची ग्वाही (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी आमदार मंगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्वांच्या मदतीने दुध संघाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची ग्वाही दिली.

 

दूध संघाच्या वीस जागांपैकी १६ जागांवर भाजप- शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर ४ जागांवर महाविकास आघाडीचे उमदेवार विजयी झाले आहेत. या  चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत आ. मंगेश चव्हाण यांनी थेट राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांना आव्हान देत आपला पारंपारिक मतदार संघ चाळीसगाव मधून निवडणूक न लढविता आ. खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर येथून निवडणूक लढवली. यात त्यांनी आ. खडसे यांच्या पत्नी तसेच जिल्हा दूध संघाच्या चेअरमन मंदाताई खडसे यांना पराभूत केले. तसेच दूध संघात सर्वाधिक जागांवर विजय मिळवून दिला. वरिष्ठांनी त्यांच्या या कामगिरीची दखल घेवून त्यांच्याकडे दूध संघाच्या चेअरमनपदाची सूत्रे दिली आहेत. आज दूध संघात झालेल्या चेअरमन निवडणुकीत आ. मंगेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांनी जाहीर केली. यानंतर आ. चव्हाण यांचे संचालक मंडळाकडून पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. दरम्यान,  आज चेअरमन निवडीच्या वेळी महाविकास आघाडीचे आ. अनिल पाटील वगळता नवनिर्वाचित सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.  यावेळी नवनिर्वाचित चेअरमन आ. चव्हाण यांनी सर्वांच्या मदतीने दुध संघाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची ग्वाही दिली.

 

चेअरमन दालनातून खडसेंचा फोटो हटविला !

आ. मंगेश चव्हाण  अध्यक्षपदी विराजमान होताच सुरुवातीलाच जिल्हा दूध संघातील एकनाथ खडसे यांचा चेअरमन दालनात असलेला फोटो या ठिकाणी काढून घेण्यात आला. त्यामुळे तब्बल सात वर्षापासून एकनाथ खडसे यांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा दूध संघावर आता भाजप शिंदे गटाची सत्ता असल्याने एकनाथ खडसेचा या ठिकाणाहून पायउतार झाल्याचे हे बोलले जात आहे.

याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, माजी आमदार दिलीप वाघ, अरविंद देशमुख, संजय पवार, आमदार चिमणराव पाटील यांच्यासह नवनिर्वाचित सदस्यांसह समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

भाग १

भाग २

भाग ३

Protected Content