‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) गुजरात, मुंबई आणि दिल्लीत कोरोनाचे संक्रमण व्हायला फेब्रुवारी महिन्यात अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आलेला ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

 

संजय राऊत यांनी ‘सामना’च्या मुखपत्रात केंद्र सरकारवर देखील टीका केली आहे. राऊत पुढे म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी खूप मोठा जनसमुदाय एकत्र आला होता. यामुळेच गुजरातमध्ये कोरोनाची लागण झाली. एवढेच नव्हे तर शिष्टमंडळातील काही व्यक्ती मुंबई आणि दिल्लीत देखील गेले होते. म्हणून कोरोना विषाणूचा फैलाव झाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागता आयोजित कार्यक्रमात ट्रम्प यांच्या शिष्टमंडळातील काही सदस्यांचा देखील या कार्यक्रमात सहभाग होता. यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण झाला. तसेच लॉकडाऊन कोणतीही योजना न आखता लागू केला मात्र आता जेव्हा लॉकडाऊन काढण्याची वेळ आली तेव्हा संपूर्ण जबाबदारी राज्यांवर सोडल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

Protected Content