भडगाव प्रतिनिधी | मुसळधार पावसामुळे पूर आलेल्या नारळी नदीत कार वाहून गेली असून यातील तिघे सुदैवाने बचावले आहेत.
मंगळवारी रात्री परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नारळी नदीला पूर आला होता. त्याचवेळी गुढे येथील राहुल महाजन हे स्विफ्ट कारने मित्राच्या कुटुंबियांना सोडण्यासाठी चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर गेले होते. परत येताना राहुल महाजन यांची कार पुराच्या वेगावान प्रवाहामुळे नदी पात्रात वाहून गेली. चालक राहुल महाजन व त्यांचे मित्र भाऊसाहेब कोष्टी व भैरवशिंग शेकवत हे तिघे वेळीच बाहेर पडल्याने बचावले. दरम्यान, वाहून गेलेली कार ही दिवसा काही अंतरावर आढळून आली.