जळगाव प्रतिनिधी । कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांच्या लेखणीतून रंगभूमीवर अवतरलेले, मराठी रंगभूमी समृध्द करणारा नाटक नटसम्राट लिहून ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने २३ डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता सुवर्णमयी नटसम्राट या अभिवाचनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मूळजी जेठा महाविद्यालयाचे कला, साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ आणि खान्देश नाट्य प्रतिष्ठान जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व संस्कार भारती, जळगाव निर्मित सुवर्णमयी नटसम्राट या नाट्य अभिवाचनाचे सादरीकरण २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता विवेकानंद भवन, तिसरा मजला येथील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागात होणार आहे. या नाट्य अभिवाचनाचे दिग्दर्शक चिंतामण पाटील असून, गणेश सोनार, प्रतिमा याज्ञिक, दिपक महाजन, हेमलता चौधरी, नेहा पवार, संस्कृती पवनीकर, अमोल ठाकूर, चंद्रकांत चौधरी, विकास वाघ आदी कलावंत यात आहेत. तांत्रिक बाजूंमध्ये प्रकाशयोजना पियुष रावळ, संगीत दर्शन गुजराथी, रंगमंच व्यवस्था मू.जे.महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग यांची असणार आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या नाट्य अभिवाचनाला उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजक अध्यक्ष कला, साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, मू.जे. महाविद्यालय यांनी केले आहे.