जळगाव प्रतिनिधी । गणेश कॉलनीतील ख्वॉजामिया दर्ग्याजवळील अतिक्रमण काढावे यासाठी नगरसेविका दिपमाला काळे यांनी वेळोवेळी महापालिकेकडे मागणी केली होती. त्यांच्या तक्रारीची महापालिकेने दखल घेत आज २१ जानेवारी रोजी भल्या पहाटे जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमित असलेला भाग काढण्यात आल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. आज दुपारी महापालिकेने तत्काळ रस्त्याची दुरूस्ती केली.
शहरातील ख्वाजामियाँ चौक व गणेश कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर असलेले वादग्रस्त अतिक्रमणा संदर्भात अनेक महिन्यांपासून स्थानिक नगरसेविका दिपमाला काळे यांनी तक्रारी व आंदोलन करून लक्ष वेधले होते. तसेच स्थानिक रहिवाश्यांकडून स्वाक्षरी मोहीम राबवून महापालिकेच्या महासभेत अतिक्रमण काढण्यासंदर्भात आवाज उठविला आहे. नगरसेविका काळे यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने महापौर भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत वादग्रस्त अतिक्रमण काढण्यात आले. आज काढलेल्या अतिक्रमणामुळे गणेश कॉलनीच्या मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
वादग्रस्त अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरीकांची होती. आज अतिक्रमण हटविण्यापुर्वी संबंधित समाज बांधवांशी चर्चा करून व विश्वासात घेवून भल्या पहाटे ५.३० वाजता अतिक्रमण पोलीसांच्या बंदोबस्तात काढण्यात आले.
यासंदर्भात नगसेविका दिपमाला काळे म्हणाल्या की, गणेश कॉलनीतील मुख्य रस्त्यावर असलेल्या वादग्रस्त अतिक्रमणामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत होता. हे अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी महापालिकेत आंदोलन, निवेदने, तक्रारी आणि स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती. याची महापालिका प्रशासनाने दखल घेवून आज अतिक्रमण काढले यासाठी आपण महापालिका प्रशासनाने आभार व्यक्त करती असल्याचे सांगितले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/228284455575580