Home धर्म-समाज नगरसेवक शेख कुर्बान यांच्यातर्फे गरजूंना शिरखुर्मा किटचे वाटप

नगरसेवक शेख कुर्बान यांच्यातर्फे गरजूंना शिरखुर्मा किटचे वाटप

0
25

फैजपूर, ता. यावल । आगामी ईदच्या पार्श्‍वभूमिवर येथील नगरसेवक शेख कुर्बान यांनी गरजूंना शिरखुर्मा किटचे वाटप केले.

याबाबत वृत्त असे की, सर्वथ कोरोना प्रादुर्भावाने थैमान घातले असून यामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. एकीकडे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. हातावर पोट असणार्‍या गोर-गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन येथील नगरसेवक शेख कुर्बान यांनी शहरातील ताहानगर, पठाणवाडी, इस्लामपूरा हजीरा मोहल्ला, मिल्लत नगर भागातील २०० गरजूंना प्रत्येकी ५०० रुपये व उत्तम दर्जाच्या शिरखुर्मा किटचे वाटप केले. बांधवांनी यंदाची ईद मुस्लिम बांधवांनी घरीच राहून साजरी करावी व प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच शहरातील गरजू नागरिकांना काही आर्थिक मदत लागल्यास सहकार्य केले जाईल असे आश्‍वासन शेख कुर्बान यांनी दिले. या वाटप प्रसंगी फिजीकल डिस्टन्सींगसह लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यात आले.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, जिल्हा दूध संघ संचालक तथा जेष्ठ नगरसेवक हेमराज चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound