जळगाव : प्रतिनिधी । जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या घरी जाऊन सोनवणे कुटुंबियांचे सांत्वन केले
काही दिवसांपूर्वीच माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे वडील व चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांचे सासरे बळीराम सोनावणे यांचे निधन झाले . यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील , उपमहापौर कुलभूषण पाटील आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारीही नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते