Home Cities जळगाव नगरविकासमंत्र्यांच्या प्रतीक्षेत गाळेधारकांची निदर्शने (व्हिडिओ)

नगरविकासमंत्र्यांच्या प्रतीक्षेत गाळेधारकांची निदर्शने (व्हिडिओ)

0
33

जळगाव, प्रतिनिधी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर आले असून ते  महापालिकेत आढावा बैठक घेणार होते.  गाळेधारकांनी आपल्याला ना. शिंदे यांनी न्याय द्यावा अशी मागणी करत महापालिकेच्या प्रशासकीय इमारती बाहेर मानवी साकळी बनवली होती. 

 

महापालिकेबाहेर मानवी साकळी बनविलेल्या गाळेधारकांनी  ‘गाळेधारकांना न्याय द्या’, गाळेधारकांना आत्महत्येची परवानगी द्या आदी मागण्या असलेले आपल्या हातात फलक घेतले होते. वेळोवेळी गाळेधारक भाडे भरण्यास तयार असून ते रीतसर करण्यात यावेत. गाळे लिलावाचा कायदा करण्यात आला आहे तो आता रद्द करण्यात यावा. यापूर्वी झालेल्या दोन बैठकीत महापालिकेत आम्ही वारंवार दाद मागून देखील न्याय मिळत नसल्याने नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी हे गाळेधारक करत होते. गाळेधारक मनपा प्रशासकीय इमारती बाहेर ना. शिंदे यांची भेट घेण्यासाठी थांबले होते, मात्र, ना. शिंदे हे महापालिकेत न येत पाचोरा येथे गेल्याने या गाळेधारकांचा हिरमोड झाला.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/190034343074584

 


Protected Content

Play sound