पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथे पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व महसूल मंडळ मुख्यालयी आजपासून सातबारा दुरुस्ती शिबीरास सुरवात झाली. पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील प्रत्येक मंडळ अधिकारी यांच्या मुख्यालयात हे शिबीर असणार आहे.
आयोजित शिबीरात सातबारा गुणवत्ता आधारित विविध दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. सदर शिबीराचा लाभ विविध शेतकरी तसेच ईतर सर्व खातेदार यांनी घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी पाचोरा तसेच तहसिलदार पाचोरा आणि भडगांव यांनी केले आहे. सध्या कोविड-१९ बाबतच्या उपाययोजना पाहता एकाच दिवशी खातेदार व शेतकरी यांनी गर्दी करू नये म्हणून सदर शिबीर ३ दिवस आयोजित केले आहे. या शिबीरा अंतर्गत ७/१२ मधील चुका दुरुस्त करणे, संगणकीकृत ७/१२ चे वाचन, नवीन फेरफार नोंदी दाखल करण्यासाठी ची कार्यवाही, प्रलंबित नोंदीची निर्गती व प्रमाणित ७/१२ वितरण, विविध स्वरूपातील अहवाल दुरुस्ती करणे अशा स्वरूपातील कामे करण्यात आली. यावेळी मंडळ अधिकारी संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी बी. डी. मंडले, जी. आर. लांजेवार, व्ही.आर.चव्हाण, तात्याराव सपकाळ, नीता चव्हाण, कैलास धिवरे यांनी शिबिरात नागरिकांच्या तक्रारींचे निर्सरन केले.