पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरसेवळा येथे शिवसेनेचे बुथप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी माजी आमदार तथा जळगाव लोकसभेचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख आर. ओ. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख प्रा. गणेश पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख अविनाश कुडे, शेतकरी सेना तालुका प्रमुख अंबादास सोमवंशी, युडी अण्णापाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना तात्यासाहेब आर. ओ . पाटील म्हणाले की, तळागाळात कार्य करणारे शिवसेनेचे खरे कार्यकर्ते आहात. पक्षाची भिस्त तुमच्यावर आहे. बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक म्हणून विजयी होण्याची पोलादी ताकद तुमच्यामध्ये आहे. कार्यकर्त्यांची जेवढी फौज शिवसेनेकडे आहे तेवढी फौज आज कोणत्याच दुसर्या पक्षाकडे नाही. उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक कटिबद्ध आहोत. विजय हा आमचा संकल्प असून भगवा फडकविणे हे आमचे ध्येय आहे म्हणून जोमाने कामाला लागून भगवा फडकविण्यासाठी सर्वानी सज्ज व्हा असे आवाहन आर. ओ. पाटील यांनी केले.
या मेळाव्याला कृष्णा सोनार, भैया महाजन, सागर पाटील, सोनू परदेशी, तुळशीराम पाटील, निंभा बापू पाटील, बंडूनाना पाटील, धर्मेंद्र पाटील, संदीप सोमवंशी, किरण पाटील, राहुल राजपूत,विश्वनाथ पाटील, भारत भामरे, सुनील महाजन, संतोष महाजन, प्रदीप परदेशी आदींसह बुथप्रमुख, उपबुथप्रमुख, शाखाप्रमुख व उपशाखाप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले तर आभारप्रदर्शन धर्मराज पाटील यांनी केले.